नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जगनमोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', असे नायडू यांनी म्हटले आहे.
जगनमोहन रेड्डी एका 'सायको'सारखे वागताय, चंद्रबाबू नायडू यांचा हल्लाबोल - Reddy is acting like a psycho
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
'जगनमोहन सरकार विरोधकांवर खटले दाखल करत आहेत. मी त्यांच्यासाठी चांगला आहे. जे माझ्यासाठी चांगले आहेत. मात्र, जगन मोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', अशी टीका नायडू केली आहे. यापूर्वी नायडू यांनी मच्छलीपट्टणम येथे आयोजित एका सभेत बोलताना जगनमोहन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरचे श्वान असल्याचे म्हटले होते.
आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.