नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी पोलिसांवर खुलेआम गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद येथे 24 फेब्रुवारीला उसळलेल्या हिंसाचारावेळी शाहरुख नावाच्या तरुणाने पोलिसांसमोर येत गोळीबार केला होता. एक आठवड्यानंतर दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.
दिल्ली हिंसाचार: पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखला उत्तरप्रदेशातून अटक - जाफराबाद गोळीबार
शान्य दिल्लीतील जाफराबाद येथे 24 फेब्रुवारीला उसळलेल्या हिंसाचारावेळी या तरुणाने पोलिसांसमोर येत गोळीबार केला होता. दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.
दिल्ली हिंसाचार
शाहरुखला २५ तारखेला अटक केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त फेटाळले होते. हिंसाचार निवळल्यानंतर विशेष तपास पथकासह दिल्ली गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. त्यानुसार शाहरुखला उत्तप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.