नवी दिल्ली - भारतीय उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी नुकतीच पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. यानंतर आता कुलभूषण जाधव यांच्यावर खोटे बोलण्यासाठी पाकिस्तान प्रचंड दबाव टाकत असल्याचे भारताने म्हटले आहे.
खोटे बोलण्यासाठी कुलभूषण यांच्यावर पाककडून दबाव, भारताचा आरोप - कॉउन्सिलर अॅक्सेस
इस्लामाबादमध्ये कुलभूषण आणि अहलुवालिया यांच्यात झालेली चर्चा तब्बल अडीच तास सुरु होती. दरम्यान यासंबंधातील अहवाल अहवुलिया यांच्याकडून मिळताच यावर त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये कुलभूषण आणि अहलुवालिया यांच्यात झालेली चर्चा तब्बल अडीच तास सुरु होती. दरम्यान यासंबंधातील अहवाल अहवुलिया यांच्याकडून मिळताच यावर त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. कूलभूषण जाधव यांना २०१६ साली हेरगिरीच्या संशयातून पाकिस्तानने कैदत घेतले आहे. यानंतर सोमवारी पहिल्यांदाच कूलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस मिळाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एस जयशंकर यांनी कुलभूषण यांच्या आईला आजच्या या भेटीची माहितीदेखील दिली आहे.