नवी दिल्ली - भाजपने वरिष्ठ पक्षनेते जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान महत्त्वाच्या पदावर राहिले आहेत.
जे. पी. नड्डा भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष, मोदी-शाहांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकारिणीचा निर्णय
'शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक निवडणुका जिंकल्या. मात्र, गृह मंत्रालयाचा कार्यभार मिळाल्यानंतर शाह यांनी स्वतःहून पक्षाचे अध्यक्षपद इतर कोणाकडे सोपवण्याचा विचार मांडला,' असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. अमित शाह येत्या डिसेंबरपर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरच राहतील.
जे. पी. नड्डा, अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत नड्डा यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या.