श्रीनगर - मुख्य निवडणूक आयुक्त शैलेंद्र कुमार यांनी रविवारी जम्मू काश्मीरमधील (बीडीसी) पंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या २४ ऑक्टोबरला राज्यातील ३१६ मधील ३१० ब्लॉकवर निवडणुका होणार आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये २४ ऑक्टोंबरला होणार पंचायत निवडणूक, मुख्य निवडणूक आयुक्ताची माहिती - जम्मू काश्मीरमध्ये २४ ऑक्टोम्बरला होणार पंचायत निवडणूक
येत्या २४ ऑक्टोम्बरला राज्यातील ३१६ मधील ३१० ब्लॉकवर निवडणुका होणार आहेत.

निवडणुकासंबधीत नोटीस येत्या १ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारिख ९ ऑक्टोबर असून कागदपत्राची तपासणी करण्याची तारीख १० ऑक्टोंबर असणार आहे. ११ ऑक्टोबर पर्यंत उमेदवार आपले अर्ज माघारी घेऊ शकतात. तर २४ ऑक्टोबरला मतदान पार पडेल, अशी माहिती शैलेंद्र कुमार यांनी दिली आहे.
कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात पहिल्यांदा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून लष्कर तैनात करण्यात आले आहे.