श्रीनगर - जम्मू काश्मिरात पाकिस्तानी सैन्याने आज शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात दोन भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात दोन भारतीय जवान हुतात्मा - पाकिस्तान शस्त्रसंधी
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन भारतीय जवान शहीद झाले.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. 'पाकिस्तानने गौनाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तोफा आणि इतर शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या या आगळीकीस जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, गोळीबारात १५ शीख लाईट रेजिमेंटरचे जवान हवालदार कुलदीप आणि ८ जम्मू काश्मीर रायफल्सचे जवान शुभम शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल (बुधवार) मानकोट भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात लान्स नायक कर्नेल सिंग शहीद झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.