श्रीनगर - जम्मू काश्मिरातील श्रीनगर शहरात आज (गुरुवार) दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. शहरताली एचएमटी भागात दुपारी ही घटना घडली. काश्मिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन दिवसांवर येऊन ठेवल्या असताना दहशतवादी हल्ल्याची घटना घडली.
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा - two soldier martyred in Kashmir
जम्मू काश्मिरातील श्रीनगर शहरात आज (गुरुवार) दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले आहेत.

काश्मिरात दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा
एचएमटी भागात घडली घटना
आज दुपारी संशयित दहशतवाद्यांनी रस्ते खुले करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार केला. एचएमटी भागात ही घटना घडली. यात दोन जवान गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली होती. जखमी अवस्थेत जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
Last Updated : Nov 26, 2020, 4:34 PM IST