श्रीनगर -जम्मू-काश्मीर पोलीस रुग्णालयात काम करणाऱ्या 2 डॉक्टरांची कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शनिवारी हे रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीनगरच्या बाटमलू भागातील जम्मू-काश्मीर पोलीस रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) काम करत असलेल्या 2 दंतवैद्यकीय डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाचे निदान झाले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिलाल राजा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना दिली.