नवी दिल्ली - दहशतवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्टाचारी नेत्यांची हत्या करावी, असे धक्कादायक वक्तव्य जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते. यावर 'एखाद्या नेत्याची हत्या झाली तर सत्यपाल मलिक त्याला जबाबदार राहतील', असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
कोणत्याही नेत्याची हत्या झाली तर त्याला सत्यपाल मलिक जबाबदार - ओमर अब्दुल्ला - Kashmir
'जर एखाद्या नेत्यांची हत्या झाली तर सत्यपाल मलिक त्याला जबाबादार राहतील', असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
या वक्तव्याचा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निषेध नोंदवला आहे. जर एखाद्या नेत्याची हत्या झाली तर सत्यपाल मलिक त्याला जबाबदार असतील, असे टि्वट ओमर यांनी केले आहे. यापूर्वी मलिक यांनी कोणताही दहशतवादी मरतो तेव्हा मला दु:ख होते, असे वादग्रस्त विधान केले होते.
कारगिल येथे भाषणादरम्यान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तरुण मुले हातात बंदूक घेऊन लोकांना मारत आहेत. पीएसओ, एसडीओंना मारत आहेत. त्यांना का मारत आहात? ज्यांनी तुमच्या देशाला लुटले त्यांना मारा, ज्यांनी काश्मीरचा खजाना लुटला त्यांना ठार करा. बंदूक हातात घेऊन काहीच साध्य होणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केले होते. मलिक यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.