वॉशिंग्टन डी. सी - पंतप्रधान मोदींनी यू-ट्यूबर योगासनाचे व्हिडिओ शेअर केले होते. याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. योग निद्रा आसनाचा व्हिडिओ शेअर केल्याबद्द मोदींचे इव्हांका यांनी विशेष आभार मानले आहेत.
...म्हणून इव्हांका ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार - मोदी योगासने व्हिडिओ
योग निद्रा आसनाचा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मोदींचे इव्हांका यांनी विशेष आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर रिप्लाय देत इव्हांका ट्रम्प यांनी आभार मानले आहेत. हे व्हिडिओ अप्रतिम असून शेअर केल्याबद्दल धन्यवाद असे त्यांनी रिप्लायमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'मन की बात' कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने तंदुरुस्त राहण्याबाबत विचारले होते. त्यानुसार पंतप्रधानांनी योगासनाचे व्हिडिओ यू-ट्यूबवर शेअर केले होते. मोदी यांनी टि्वटरवर एक यू-ट्यूब लिंक शेअर केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या योगासनाशी संबंधित व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओ सुमारे 2 ते 4 मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींची व्यंगचित्र प्रतिमा वापरण्यात आली आहे.