महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'दहशतवादाशी माझा संबंध जोडणे दुर्दैवी..' - Zakir Naik terroism

मी दहशतवादी असल्याचा एकही पुरावा मिळाला नसताना एनआयए माझा दहशतवादाशी संबंध जोडत आहे, हे दुर्दैवी असल्याचे वक्तव्य विवादीत धर्मगुरु झाकीर नाईक यांनी केले आहे.

Zakir Naik on NIA report

By

Published : Oct 16, 2019, 7:06 PM IST

नवी दिल्ली - दहशतवादी असल्याचा एकही पुरावा नसताना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) माझा संबध दहशतवादाशी जोडत आहेत. गेली ३ वर्षे माझी चौकशी करुनही एएनआयएला एकही पुरावा मिळाला नाही. तरीही, माझा दहशतवाद्यांशी संबध असल्याचे एएनआय उघडपणे म्हणत आहे हे दुर्दैवी असल्याचे मत झाकीर नाईक यांनी व्यक्त केले आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थन करणाऱ्या जेवढ्या लोकांना भारतातून अटक करण्यात आली होती, त्यांपैकी बहुतेक जणांनी झाकीर नाईकला पाहून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे कबूल केले आहे. 2016 मध्ये ढाका येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर अब्दुल करीम नाईक भारत सोडून पळून गेला होता. या हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर नाईकच्या युट्यूबवरील प्रवचनाने प्रेरित झालेला होता. झाकीर नाईक याने सध्या मलेशियामध्ये आश्रय घेतला आहे. मात्र, मलेशियन सरकारदेखील त्याला तेथून हद्दपार करण्यासाठी दुसऱ्या देशाच्या शोधात आहे. याआधी मलेशियन सरकारने, जातीयवाद पसरण्याच्या भीतीने नाईक याच्या भाषणांवर बंदी आणली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details