महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण.. - nCoV

सध्या या दोघांनाही जयपूरच्या सवाई मानसिंग रूग्णालयातील विशेष कक्षामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हे दोघेही इटलीहून भारतात आले होते. भारतात आल्यानंतर या दोघांचा ज्या लोकांशी संपर्क आला, त्या सर्वांची तपासणी सुरू आहे.

Italian tourist's wife tested positive for coronavirus at Jaipur hospital
जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण..

By

Published : Mar 3, 2020, 8:10 PM IST

जयपूर -जयपूरमध्ये कोरोनाचा रूग्ण असलेल्या इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की या दोघांच्याही रक्ताचे नमुने हे दुसऱ्या तपासाणीसाठी पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला पाठवण्यात आले आहेत.

सध्या या दोघांनाही जयपूरच्या सवाई मानसिंग रूग्णालयातील विशेष कक्षामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. हे दोघेही इटलीहून भारतात आले होते. भारतात आल्यानंतर या दोघांचा ज्या लोकांशी संपर्क आला, त्या सर्वांची तपासणी सुरू आहे.

यासोबतच, दिल्ली आणि तेलंगाणामध्येही कोरोनाचे एक-एक रूग्ण आढळून आले आहेत. तसेच तेलंगाना, नोएडा याठिकाणी कोरोनाचा संसर्ग झालेले आणखीही संशयित रूग्ण आढळले आहेत.

हेही वाचा :सोशल मीडियाऐवजी 'कोरोना'वर लक्ष द्या; राहुल गांधींचा मोदींना टोला..

ABOUT THE AUTHOR

...view details