जयपूर - देशभरात कोरोना संसर्गामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच रास्थानातील जयपूरमध्ये एका परदेशी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दगावलेला व्यक्ती इटलीचा नागरिक असून राजस्थानात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. फोर्टिस रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
इटलीच्या कोरोनाग्रस्ताचा जयपुरात मृत्यू; देशभरात ५ जण दगावले
नुकतेच एंड्री याची कोरोना चाचणीही नकारात्मक आली होती. बरे झाल्यानंतर इटली दुतावासाच्या आग्रहामुळे पुन्हा फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुरवातीच्या चाचण्यांमध्ये एंड्री कार्ली या व्यक्तीची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली होती. त्याच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, उपचारानंतर पत्नीला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. नुकतेच एंड्री याची कोरोना चाचणीही नकारात्मक आली होती. बरे झाल्यानंतर इटली दुतावासाच्या आग्रहामुळे पुन्हा फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एंड्री कार्लीच्या मृत्यूनंतर भारतात मृतांचा आकडा ५ झाला आहे. याआधी महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, चंदिगडमध्ये प्रत्येक एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.