लखनौ - आपल्या पुतळे स्थापित करण्याची जनतेची इच्छा होती, असे स्पष्टीकरण बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुतळ्यांच्याप्रकरणात त्यांना आज उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मायावती यांनी शपथपत्र दाखल करुन वरील उत्तर दिले आहे.
मागच्या महिन्यात ८ तारखेला मायावतींच्या पुतळ्यांच्याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मयावतींना तोंडी फर्मान सुनावले होते. तुम्ही हत्तींच्या पुतळेबांधण्यासाठी जनतेचा मोठा पैसा खर्च केलेला दिसतोय. आम्हाला वाटते की तुम्ही हा संपूर्ण पैसा परत करायला हवेत, असे सरन्यायाधीश म्हणाले होते. तसेच २ एप्रिलपर्यंत आपले उत्तर नोंदवण्यास सांगितले होते.