मुंबई - आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षण याबद्दलच्या आपल्या वादग्रस्त वक्तव्याची पियूष गोयल यांना आता उपरती झाली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
माझे आईनस्टाईन बद्दलचे वक्तव्य चुकीचे होते, मी विज्ञान शाखेतून नंतर कॉमर्सला प्रवेश घेतल्याने माझी जीभ घसरली, असे म्हणत त्यांनी माफी मागितली. मात्र, तरीही मी चूक करण्यापासून घाबरणारा नाही, आईनस्टाईनचेच एक वाक्य आहे, 'अ पर्सन हू नेव्हर ट्राईज, नेव्हर सक्सीड्स'. आईनस्टाईनचा संबंध रिलेटीव्हिटी सोडून चुकून ग्रॅव्हिटीशी जोडला, मात्र त्याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. मला ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीबद्दल उदाहरण द्यायचे होते, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.