महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ही' राजकीय उद्देशाने केलेली कारवाई होती - प्रवीण कक्कड - bjp

'२ दिवस कारवाई सुरू ठेवल्यानंतरही प्राप्तिकर विभागाला काहीच सापडले नाही. 'ही' राजकीय उद्देशाने केलेली कारवाई होती,' असे कक्कड यांनी म्हटले आहे.

प्रवीण कक्कड

By

Published : Apr 9, 2019, 10:38 AM IST

इंदोर - 'प्राप्तिकर विभागाने कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर टाकलेला छापा ही राजकीय उद्देशाने केलेली कारवाई होती,' असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष अधिकारी प्रवीण कक्कड यांनी म्हटले आहे. त्यांचे घर, कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. ही कारवाई २ दिवस सुरू होती.

'२ दिवस कारवाई सुरू ठेवल्यानंतरही प्राप्तिकर विभागाला काहीच सापडले नाही. त्यांना जप्त करण्यालायक एकही कागदपत्र सापडले नाही. तसेच, त्यांनी रोख रक्कम किंवा दागिनेही जप्त केले नाहीत. तसेच, त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. 'ही' राजकीय उद्देशाने केलेली कारवाई होती,' असे कक्कड यांनी म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी इंदोर, भोपाळ, गोवा आणि दिल्ली एनसीआर येथे छापे टाकले होते. कक्कड यांचा मुलगा सलील यांना प्राप्तिकर विभागाच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच वेळी प्रवीण यांचे सहकारी अश्विन शर्मा यांच्या घरासह देशात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details