बंगळुरू - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या ५ मार्चला 'GISAT-1' या इमेजिंग उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. 'GSLV-F10' प्रक्षेपण वाहनाद्वारे हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येईल.
५ मार्चला संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून हे प्रक्षेपण नियोजित आहे. तब्बल २ हजार २७५ किलोच्या या उपग्रहाद्वारे पृथ्वीचे जवळून निरीक्षण करता येणार आहे.