ISRO: PSLV-C 45 अवकाशात झेपावले, EMISAT सह २८ उपग्रहाचे प्रक्षेपण
सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह इस्रोने एमिसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
एमिसॅट
श्रीहरीकोटा- इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह इस्रोने एमिसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एमिसॅट या उपग्रहाबरोबरच विविध देशाच्या २८ उपग्रहाचेही प्रक्षेपण करण्यात आले आहे.
इस्त्रोचे हे अभियान पीएसएलव्ही-सी-४५ रॉकेटच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे ४७वे उड्डाण आहे.
सीमेवरील रडार आणि सेन्सरवर हा उपग्रह लक्ष ठेवणार -
एमिसॅट सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. इस्त्रो आणि डीआरडीओने हा उपग्रह बनवला आहे. पाकिस्तानच्या सीमेवर हालचालींवर लक्ष ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. सीमेवरील रडार आणि सेन्सरवर हा उपग्रह लक्ष ठेवणार आहे.
'एमिसॅट' काय आहे -
- - ही इस्त्रोची स्वचलित प्रणाली आहे, जी जहाजांमधील संदेशांना कॅप्चर करते.
- - अंतराळातील विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचा तपास करणार.
- - या उपग्रहाचे वजन ४३६ किलोग्रॅम आहे.
- - डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी देशातच या उपग्रहाची निर्मिती केली आहे.
- - ७४९ किलोमीटर उंचीच्या कक्षेमध्ये स्थापित होणार.
Last Updated : Apr 1, 2019, 10:25 AM IST