नवी दिल्ली - संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेचे 22 जुलैला (सोमवारी) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. दरम्यान, आता या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे. याची माहिती इस्रोने ट्विट करुन दिली.
भारताच्या चांद्रयान-2 चा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश - spacecraft
भारताच्या चांद्रयान - 2 ने 24 जुलैला पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर या यानाने आज (शुक्रवारी) मध्यरात्री 1 वाजता पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. दरम्यान हे यान 29 जुलैला पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्त्राने ट्विट करुन दिली.

इस्त्रोच्या चांद्रयान - 2 यानाचा वेग पाहता या यानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 48 दिवसाचा कालावधी लागणार आहे. सद्य स्थितीत या यानाने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे.