बंगळुरु - चंद्रावर विक्रम लँडरचे नेमके स्थान शोधण्यात इस्रोला यश मिळाले आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रम लँडरची थर्मल छायाचित्रे घेतली आहेत. ज्यामुळे विक्रम लँडर कुठे आहे याचा अंदाज इस्रोला लावता येत आहे.
विक्रम लँडरशी अद्याप संपर्क साधला गेला नसला, तरी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच विक्रमशी संपर्क साधला जाऊ शकेल, असे इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : इस्रोच्या चांद्रयान मोहिमेवर नासाची प्रतिक्रिया...
चंद्रापासून २.१ किमी दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास १४ दिवसांता कालावधी लागू शकतो, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन म्हणाले होते.