बंगळुरु - चांद्रयान-२ वरून चंद्राचे काढलेले पहिले छायाचित्र पाठवले आहे. चांद्रयान 2 ने हे छायाचित्र तब्बल २६५० किमी अंतरावरुन काढले आहे. २१ ऑगस्टला 1 हजार 738 सेकंदांत चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचले होते. चांद्रयान मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा होता.
इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान-२ ने काढले चंद्राचे पहिले छायाचित्र - इस्रो
चांद्रयान-२ ने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. यानाने हे छायाचित्र तब्बल २६५० किमी अंतरावरुन काढले आहे.
चांद्रयान-२ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत. चांद्रयान २ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वी चांद्रयानाने पृथ्वीचे पहिले छायाचित्र टिपले होते. हे छायाचित्र एलआय ४ या कॅमेऱ्याने ३ ऑगस्टला टिपले होते. दरम्यान, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून चांद्रयान-2 अवकाशात झेपावले आहे. लॉन्चिंगनंतर ५४ दिवसाने म्हणजेच ५ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर पोहचणार आहे. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.