महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrayaan-2 LIVE : पंतप्रधान मोदी बंगळुरुमध्ये पोहोचले, इस्रोचीदेखील तयारी पूर्ण! - चांद्रयान-२

isro-chandrayaan-2-updates-live

By

Published : Sep 6, 2019, 10:20 PM IST

Updated : Sep 6, 2019, 11:44 PM IST

21:59 September 06

Chandrayaan-2 LIVE : पंतप्रधान मोदी बंगळुरुमध्ये पोहोचले, इस्रोचीदेखील तयारी पूर्ण!

बंगळुरु - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंगळुरु विमानतळावर आगमन झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. आता थोड्याच वेळात ते इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रोच्या मुख्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत.

Chandrayaan-2 LIVE UPDATE -

  • 11.30 PM - 130 कोटी भारतीयांची उत्कंठा शिगेला, देशभर प्रार्थना, होमवहन
  • 11.05pm - चांद्रयानच्या यशस्वीतेसाठी देशभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव.       
  • 10.45 pm - चांद्रयान २ मिशन यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार.
  • 10:30 PM - पंतप्रधान मोदी हे एक वाजेपर्यंत इस्रोच्या मुख्यालयात पोहोचणार.
  • 10:25 PM - चांद्रयानाच्या लँडिंगसाठी इस्रोची तयारी पूर्ण असल्याचे, इस्रोने "We Are Ready" असे ट्विट करत सांगितले आहे. 
  • 9:50PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु विमानतळावर पोहोचले.

देशासह जगभरातील वैज्ञानिक आणि भारतातील सर्व लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या सर्वांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील, चांद्रयान-२ च्या लँडिंगसाठी उत्सुक आहेत. चांद्रयान-२ च्या वाटचालीची, तिथल्या घडामोडींची ते क्षणाक्षणाला माहिती घेत आहेत.

Last Updated : Sep 6, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details