महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनावर लस शोधल्याचा इस्राईलचा दावा; मानवी चाचणीसाठी सज्ज

इस्राईलचे संरक्षण मंत्री बेन्नी गँट्झ यांनी इस्राईलच्या इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च या संस्थेला भेट दिली. या संस्थेचे संचालक श्मुएल शापिरा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संरक्षण मंत्र्यांनी इस्राईल लवकच कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.

COVID-19 vaccine
कोरोनावर लस शोधल्याचा इस्राईलचा दावा; मानवी चाचणासाठी सज्ज

By

Published : Aug 7, 2020, 6:51 PM IST

जेरुसलेम -इस्राईलचे संरक्षण मंत्री बेन्नी गँट्झ यांनी इस्राईलच्या इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च या संस्थेला भेट दिली. या संस्थेचे संचालक श्मुएल शापिरा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संरक्षण मंत्र्यांनी इस्राईल लवकरच कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वसामान्यांसाठी लस कधी आणि केव्हा उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

गुरुवारी संरक्षण मंत्री बन्नी गँट्झ यांनी इस्राईलच्या इन्स्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च या संस्थेला भेट देऊन कोरोनाच्या लसीबद्दल आढावा घेतला. यावेळी त्यांनी इस्राईल लवकरच मानवी चाचणीसाठी सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.

ही एक उत्कृष्ट लस आहे, असे श्मुएल शापिरा म्हणाले. सध्या बायोलॉजिकल रिसर्च संस्थेला आवश्यक त्या सर्व प्रक्रियेतून जाण्यासाठी सरकारने सर्वतोपरी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आणि बेनी गँट्झ यांनी नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार या लसीच्या चाचण्या पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शरद ऋतूतील सुट्ट्यांनंतर उर्वरित चाचण्या म्हणजेच सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या चाचण्या सुरू करणार असल्याचे संचालकांनी सांगितले. परंतु उत्पादन हातात आहे, संरक्षण मंत्रालय आणि पीएमओ यांच्या संयुक्त देखरेखीखाली काम करणारे आयआयबीआरचे संचालक शापिरा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शरिरात अॅन्टीबॉडीज तयार करू शकणारी लस विकसित करण्याच्या आयआयबीआरच्या प्रगतीबद्दल संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली. गँट्झ यांनी शरद ऋतूतील सुटीनंतर मानवी चाचण्या सुरू करण्याचे निर्देश संस्थेला दिले, असे संरक्षण मंत्र्यांच्या प्रवक्त्यांच्या युनिटच्या पत्रकात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details