नवी दिल्ली -जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमद हा गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र, अद्याप त्याचा काहीही शोध लागलेला नाही. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेकडून निदर्शन करण्यात आले. यावेळी जेएनयूचे सुरक्षा कर्मचारी आणि दिल्ली पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेपत्ता नजीब अहमद प्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेकडून निदर्शन - जेएनयू विद्यार्थी संघटना लेटेस्ट न्यूज
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नजीब अहमद हा गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहे. मात्र, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. यावर गुरुवारी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेकडून निदर्शन करण्यात आले.
चार वर्षानंतरही नजीब सापडला नाही. हे दिल्ली पोलीस आणि सीबीआयचे अपयश आहे. जवळपास सर्व शैक्षणिक संस्था उघडल्या गेल्या आहेत. मात्र, अद्याप जेएनयू बंद आहे. दिल्लीतील उद्याने, सिनेमा हॉल, मॉल्स सर्व उघडली आहेत. तर मग जेएनयू सुरू करण्यात प्रशासनाला काय अडचण आहे, असा सवाल जेएनयू विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस सतीशचंद्र यादव यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी जर दिल्ली पोलिसांनी नजीबचा शोध घ्यायला हवा होता. नजीब बेपत्ता होऊन चार वर्षे झाली आहेत, परंतु नजीबचा कोणताही शोध लागला नाही. विद्यार्थी संघटनेचे हे प्रदर्शन नजीबला न्याय देण्यासाठी आहे, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशा घोष म्हणाल्या.