नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी समाजवादी पक्षाला हरवण्यासाठी भाजपला मदत करावी लागली तर तेही करू, अशी जाहीर घोषणा केली आहे. यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी टि्वट करत मायवतींवर निशाणा साधला. यानंतर अजूनही काही बाकी आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
'त्या' घोषणेवरून प्रियांका गांधींचा मायावतींवर निशाणा; म्हणाल्या... - उत्तर प्रदेश लेटेस्ट न्यूज
समाजवादी पक्षाला हरवण्यासाठी भाजपला मदत करावी लागली तर करू, अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी टि्वट करत मायवतींवर निशाणा साधला.
प्रियांका गांधी
बसपाच्या काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात शिरकाव केला आहे. समाजवादी पक्षाच्या गोटात शिरलेल्या आमदारांच्या निलंबनाची घोषणा मायवतींनी केली आहे. जे आमदार समाजवादी पक्षात सहभागी झाले, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपुष्टात येतोय. यासाठी 9 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे.