नवी दिल्ली - इराणने १३ जुलैला MT Riah (एमटी-रिआह) व्यापारी जहाज पकडले होते. जहाजावर अटक केलेल्या क्रु-मेंबर्समध्ये १२ भारतीय लोकांचाही समावेश होता. यापैकी ९ जणांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली आहे.
इराणने जप्त केलेल्या जहाजावर अटकेतील ९ भारतीयांची केली सुटका; ४५ जण अजूनही ताब्यात - स्टेनो इम्पेरो
युरोपिअन संघाच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली जहाजांना जप्त करण्यात आले होते. अटक केलेल्या ९ भारतीय क्रु-मेंबर्सची सुटका करण्यात आली आहे. ते लवकरच भारतात पोहचणार आहेत.
रवीश कुमार यांनी माहिती देताना सांगितले, की ९ भारतीय क्रु-मेंबर्सची सुटका करण्यात आली आहे. ते लवकरच भारतात पोहचणार आहेत. आम्ही इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून उर्वरित क्रु-मेंबर्सची तातडीने सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
इराणने अटकेत असलेल्या ९ भारतीयांची सुटका केली असली तरीही अजून २१ भारतीय इराणच्या ताब्यात आहेत. यामध्ये MT Riah (एमटी-रिआह) या जहाजावर ३ तर, इंग्लंडच्या स्टेनो इम्पेरोवरील १८ जण अटकेत आहेत. तर, ग्रेस-१ या जहाजावर असणारे २४ भारतीय क्रु-मेंबर्स जिब्राल्टर पोलिसांच्या ताब्यात आहेत. ताब्यात असलेल्या भारतीयांसोबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. युरोपिअन संघाच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली जहाज जप्त करण्यात आले होते.