महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिदंबरम यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करा, न्यायालयाचे 'एम्स'ला निर्देश - p chidambrams health issue

चिदंबरम यांनी आरोग्याच्या समस्येवरील उपचारांसाठी न्यायालयाकडे अंतरिम जामीन मागितला आहे. यानंतर न्यायालयाने एम्सला चिदंबरम यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. नागेश्वर रेड्डी यांचा न्यायालयाच्या निर्देशांनुसार यात समावेश केला आहे. ते चिदंबरम यांचे फॅमिली डॉक्टर आहेत.

वरिष्ठ काँग्रेस नेते चिदंबरम

By

Published : Oct 31, 2019, 1:46 PM IST

Updated : Nov 1, 2019, 10:18 AM IST

नवी दिल्ली -दिल्ली उच्च न्यायालयाने एम्स रुग्णालयाला वरिष्ठ काँग्रेस नेते चिदंबरम यांच्या प्रकृतीचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चिदंबरम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना आतड्याशी संबंधित विकार आहे.

चिदंबरम यांनी आरोग्याच्या समस्येवरील उपचारांसाठी न्यायालयाकडे अंतरिम जामीन मागितला आहे. यानंतर न्यायालयाने एम्सला चिदंबरम यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. नागेश्वर रेड्डी यांचा न्यायालयाच्या निर्देशांनुसार यात समावेश केला आहे. ते चिदंबरम यांचे फॅमिली डॉक्टर आहेत. सायंकाळी ७ वाजता समितीतील सदस्य एकत्र येऊन हा अहवाल तयार करतील.

पी. चिदंबरम आयएनएक्स माध्यम गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीग प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 'फॉरेन इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डा'मध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Last Updated : Nov 1, 2019, 10:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details