नवी दिल्ली - रोज अव्हेन्यू कोर्टाने पी चिदंबरम यांना, आयएनएक्स प्रकरणी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी, सर्वोच्च न्यायालयाने आज चिदंबरम यांची आयएनएक्स प्रकरणातील जामिनाची मागणी फेटाळली होती.
चिदंबरम हे १५ दिवस सीबीआयच्या ताब्यात होते. १५ दिवसांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयात सीबीआयच्या तुषार मेहता यांनी म्हटले, की चिदंबरम यांना जामीन दिल्यास, ते आपले राजकीय वजन वापरून पुराव्यांमध्ये बदल करु शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला नाही पाहिजे. यावेळी न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या बेंचने, ही बाब लक्षात घेत, चिदंबरम यांचा जामीन रद्द केला.