दरवर्षी 2 सप्टेंबरला 'जागतिक नारळ दिन' साजरा केला जातो. याची सुरुवात 2009 मध्ये झाली. हा आशिया पॅसिफिक नारळ समुदायाचा (एपीसीसी) स्थापना दिवस आहे. एपीसीसी ही 18 सदस्य देशांची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याचे मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया येथे आहे. या दिनाची यंदाची थीम 'Invest in coconut to save the world' (जगाला वाचवण्यासाठी नारळ पिकात गुंतवणूक करा) अशी आहे.
या संस्थेद्वारे जास्तीत जास्त आर्थिक विकास साधण्यासाठी आशियाई पॅसिफिक प्रदेशातील नारळ विकासाच्या कार्यास प्रोत्साहन, समन्वय आणि सुसंवाद साधला जातो. भारत एपीसीसीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.
महत्त्व:-
भारतात, नारळ विकास मंडळाच्या वतीने देशभरातील विविध नारळ उत्पादक राज्यांमध्ये दरवर्षी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळ पिकामधील गुंतवणुकीला आणि उत्पादनाला प्रोत्साहन देऊन गरिबीशी लढा देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तसेच, नारळाचे महत्त्व पसरविणे आणि नारळ उद्योगाच्या विकासास चालना देणे हेही याचे उद्दीष्ट आहे.
• कौटुंबिक आरोग्यासाठी नारळ “Coconut for Family Wellness” ही जागतिक नारळ दिन 2019 मधील थीम होती.
• चांगले आरोग्य, संपत्ती आणि निरोगी राहण्यासाठी नारळ “Coconut for Good Health, Wealth & Wellness” ही जागतिक नारळ दिन 2018 मधील थीम होती.
• नारळासह निरोगी आणि संपन्न जीवन ‘A healthy wealthy life with coconut’ ही ही जागतिक नारळ दिन 2017 ची थीम होती.
नारळाबद्दलची काही तथ्ये
- नाव - नारळ
- वैज्ञानिक नाव - कोकोस न्यूसिफेरा
- मूळ - दक्षिण-पूर्व आशियाच्या किनारपट्टी भागात
- रंग - फळ कच्चे असताना रंग हलका हिरवा असतो. ते पिकल्यानंतर तो पिवळसर राखाडी होतो. फळातील गराचा रंग पांढरा.
- चव - सौम्य आणि गोड
- कॅलरी - 283 किलोकॅलरी / कवड
मुख्य पोषक तत्त्वे
- एकूण चरबी (76.54%)
- मँगनीज (52.17%)
- तांबे (38.67%)
- लोह (24.25%)
- एकूण आहारातील फायबर (18.95%)
- सेलेनियम, Se 8.1 μg (14.73%)
- फॉस्फरस, P 90 mg (12.86%)
- कार्बोहायड्रेट 12.18 g (9.37%)
- झिंक, Zn 0.88 mg (8.00%)
- व्हॅलिन 0.162 g (7.67%)
आरोग्यासाठी फायदे
• हृदयासाठी चांगले
• वजन व्यवस्थापन
• रक्तातील साखर नियंत्रण
• आजाराच्या संक्रमणापासून संरक्षण
• पचन सुधारते
• त्वचा संक्रमण प्रतिबंधित करते
• केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते
• शरीरातील उर्जा पातळीला उत्तेजन देते
• कॅन्डिडा
• उपचार आणि संक्रमण
• तणाव मुक्त
• हाडांचे आरोग्य
• दातांचे आरोग्य
• शरीरातील पाण्याची पातळी वाढवते
• रक्तदाब कमी करते
• अतिकामामुळे आलेल्या थकव्यापासून मुक्ती
• डोकेदुखीवर उपचारांसाठी फायदेशीर
जगातील नारळ उत्पादन : नारळ हे एक लोकप्रिय पीक आहे. जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये याची लागवड केली जाते. नारळाची लागवड करणे काहीसे अवघड असले तरी एकदा याची झाडे व्यवस्थित वाढू लागली की ते वर्षभर नारळ आणि इतर उत्पन्न देते. जागतिक स्तरावर नारळाचे उत्पादन प्रतिवर्षी सुमारे 55 दशलक्ष टनांपर्यंत होते. जगात इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे प्रमुख नारळ उत्पादक देश आहेत.
जगातील प्रमुख 3 नारळ उत्पादक देश
देशातील उत्पादित नारळ (टनांमध्ये)
1. इंडोनेशिया 183,000,000 टन
2. फिलिपिन्स 153,532,000 टन
3. भारत 119,300,000 टन
या देशांकडून निर्यात - 2018 मध्ये इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त नारळाची निर्यात करणारा देश होता. येथून होणाऱ्या नारळाच्या निर्यातीचे प्रमाण 290 हजार टन होते. हे इतर नारळ निर्यातदार देशांच्या तुलनेत 52% होते. त्या वर्षी इंडोनेशियानंतर थायलंडने 70 हजार टनांसह दुसरी जागा पटकावली होती. यानंतरच्या स्थानी 57 हजार टन नारळाच्या निर्यातीसह व्हिएतनाम होता. या दोन देशांनी एकूण नारळ निर्यातीपैकी जवळजवळ 23% जागा घेतली होती.
कोटे डीव्हॉयर (23 हजार टन), मलेशिया (19 हजार टन), नेदरलँड्स (16 हजार टन), मेक्सिको (14 हजार टन), गयाना (12 हजार टन), भारत (11 हजार टन) या सर्व देशांनी एकत्रितपणे 17% निर्यात केली होती.
या देशांद्वारे आयात -2018 मध्ये थायलंड (210 हजार टन) आणि मलेशिया (199 हजार टन) हे नारळांचे सर्वात मोठे आयातदार देश होते. एकूण आयातीपैकी त्यांचा अनुक्रमे 31% आणि 30% भाग होता. चीनने 60 हजार टनांसह एकूण आयातीपैकी 9% आयात केली. त्याखालोखाल अमेरिकेने 5.7% नारळांची आयात केली. संयुक्त अरब अमिरातीने 27 हजार टन, नेदरलँड्सने 19 हजार टन आणि सिंगापूरने 11 हजार टनांची आयात केली.
भारताची स्थिती - नारळ उत्पादनात भारत आघाडीवर आहे . जगातील प्रमुख नारळ उत्पादक देशांमध्ये आणि नारळ पिकांतर्गत क्षेत्रात भारताचे तिसरे स्थान आहे. देशीतील नारळाचे वार्षिक उत्पादन 2395 कोटी आहे. तर, पिकांतर्गत क्षेत्र 20.82 लाख हेक्टर आहे. प्रतिहेक्टरी 11 हजार 505 नारळांचे उत्पादन होते. देशाच्या सकल उत्पादनात नारळांचा वाटा 27 हजार 900 कोटी रुपयांचा आहे. 2016-17 मध्ये 2084 कोटी रुपयांच्या नारळाची निर्यात करण्यात आली. देशातील एक कोटींहून अधिक जनता रोजीरोटीसाठी नारळ पिकावर अवलंबून आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा ही राज्ये नारळाची प्रमुख उत्पादक आहेत.
केरळ हे भारतातील नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. देशातील एकूण नारळ उत्पादनात याचा सुमारे 45 टक्के वाटा आहे. नारळाच्या खोबऱ्यापासून नारळ तेल मिळते. नारळाच्या उत्पादनाखालील क्षेत्र देशात सर्वाधिक असल्याने केरळ पुन्हा एकदा खोबरेल तेलाच्या बाबतीतही देशांतील सर्व राज्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
नारळ उत्पादनांची निर्यात
- सक्रीय कार्बन, शुद्ध नारळ तेल, नारळ तेल, कोरडे नारळ, निरुपयोगी नारळ, खोबरे, नारळ बाह्य आवरणाचा कोळसा इत्यादी मुख्य नारळ उत्पादनांची निर्यात केली जाते.
- नारळ उत्पादनांच्या निर्यातीतील 45% वाटा सक्रिय कार्बनचा आहे. 2015-16 मध्ये पहिल्या दहा महिन्यांत भारताने 531.78 कोटी रुपयांच्या 51644.61 टन सक्रिय कार्बनची निर्यात केली. भारतातून निर्यात झालेल्या सक्रिय कार्बनपैकी सुमारे 32% कार्बन युरोपियन महासंघातील देशांमध्ये आणि सुमारे 28% कार्बन अमेरिकेला निर्यात करण्यात आला.
- भारतातून निर्यात करण्यात येणाऱ्या नारळ तेलापैकी 51% हून जास्त तेल आखाती देशांना पाठवले जाते. तर, सुमारे 69% शुद्ध नारळ तेल अमेरिकेला पाठवले जाते. सध्या नारळ भारताच्या निर्यात उत्पन्नाच्या 10% हून अधिक वाटा उचलतो. भारताने 31191.73 टन नारळांची नुकतीच निर्यात केली. त्यापैकी 63% पेक्षा जास्त निर्यात आखाती देशांना करण्यात आली.