सीएए आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील २१ जिल्ह्यातली इंटरनेट सेवा खंडित
नारिकत्व सुधारणा विधेयकावरून उत्तरप्रदेशातील वातावरण तापलेले आहे. १९ तारखेला राज्यात झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) नमाज पठणाच्या दिवशी राज्यातील २१ जिल्ह्यामधील इंटरनेट बंद ठेवण्यात आली आहे.
लखनौ - नारिकत्व सुधारणा विधेयकावरून उत्तरप्रदेशातील वातावरण तापलेले आहे. १९ तारखेला राज्यात झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) नमाज पठणाच्या दिवशी राज्यातील २१ जिल्ह्यामधील इंटरनेट बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मशिदींबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अनेक संवेदनशील भागांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येत आहे. १९ डिसंबरला राजधानी लखनौमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. त्यावेळी पोलिसांनी १२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत. तसेच २०० पेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सीएए कायद्याच्या विरोधात आत्तापर्यंत राज्यामध्ये ३२७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ११३३ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. तर ५ हजार ५५८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. राज्यामध्ये या कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८८ पोलीस जखमी झाले आहेत. यातील ६१ पोलीसांना गोळी लागली आहे.
सोशल मीडियावरून अफवा आणि द्वेष पसरवणाऱ्यांनाही पोलीस ताब्यात घेत आहेत. यासंबधी ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १२४ जणांना अटक करण्यात आली आहे. यासर्व पोस्ट सोशल मिडियावरून काढूनही टाकण्यात आल्या आहेत.