महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा बंद - नागरिकत्व दुरुस्ती कायदा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतसह देशातील अनेक राज्यांतून विरोध होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगाल राज्यातील काही भागांत इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे.

CAA PROTEST
पश्चिम बंगाल आंदोलन

By

Published : Dec 15, 2019, 4:36 PM IST

Updated : Dec 15, 2019, 4:55 PM IST

कोलकाता - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतसह देशातील अनेक राज्यांतुन विरोध होत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल राज्यातील काही भागांत इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. काल (शनिवारी) हिंसक आंदोलकांनी रेल्वे आणि बस पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर इंटरनेत सेवा बंद

हेही वाचा -JNU आंदोलन: विद्यार्थ्यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं; दोषींवर कारवाई करणार


मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर आणि हावडा जिल्ह्यामध्ये इंटरेनेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. याबरोबरच उत्तर २४ परगाणा जिल्ह्यातील बरासात आणि बशिरहाट, दक्षिण परगाणा जिल्ह्यातील काही भागात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये काल (शनिवारी) लालगोला रेल्वे स्थानकावर ५ मोकळ्या रेल्वे पेटवून दिल्या. तर शेजारील कृष्णगंज रेल्वे स्थानकावर ६ रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली. याबरोबरच हावडा परिसरातील १० ते १५ बस पेटवून देण्यात आल्या.

शांततेचे आवाहन केल्यानंतरही काही राज्याबाहेरील गट हिंसा घडवून आणत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट सेवा बंद करण्यावाचून प्रशासनाकडे दुसरा पर्याय नाही, असे राज्य प्रशासनाने एका नोटीसद्वारे जाहीर केले.

हेही वाचा -आसाम : CAA विरोधातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू, २७ जखमी


नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याला ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम बंगालने कडाडून विरोध केला आहे. १५ रेल्वे गाड्या रद्द केल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने आज सकाळी दिली. राज्याच्या काही भागातील रस्ते आंदोलकांनी बंद केल्याची माहितीही मिळत आहे. काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी शांतता मोर्चेही आयोजित केले आहेत.

Last Updated : Dec 15, 2019, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details