महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आईनस्टाईनपासून तर पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी दाखवून दिले 'Left is Right'

डाव्या हाताने शेकहँड केल्यास समोरच्या व्यक्तीचा अनादर केला, असे मानले जाते. अशा काही वाईट रुढी समजात पसरल्या आहेत. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी  गेल्या १९७६ मध्ये प्रचारक डीन आर. कॅम्बेल यांनी पहिल्यांदा LeftHandersday साजरा केला होता. तेव्हापासून दरवर्षी १३ ऑगस्टला #internationallefthandersday दिवस साजरा केला जातो.

आईनस्टाईनपासून तर पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी दाखवून दिले 'Left is Right'

By

Published : Aug 13, 2019, 6:51 AM IST

Updated : Aug 13, 2019, 5:40 PM IST

नवी दिल्ली - डावखुरे असणारे व्यक्ती अनेकदा न्यूनगंड बाळगत असतात. मात्र, याउलट डावखुरे असणे ती त्या व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. अल्बर्ट आईनस्टाईन, बराक ओबामा, बिल गेट्स, महात्मा गांधी, महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व डावखुरे आहेत. मात्र, त्यांनी आपल्या नेतृत्त्वाने जगाला भुरळ घातली आहे. त्यामुळे डावखुऱ्या लोकांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता आज अगदी गर्वाने, अभिमानाने #InternationalLeftHandersday साजरा करायला पाहीजे.

#internationallefthandersday : आईनस्टाईनपासून तर पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनी दाखवून दिले 'Left is Right'

#internationallefthandersday का साजरा करतात?

डाव्या हाताने शेकहँड केल्यास समोरच्या व्यक्तीचा अनादर केला, असे मानले जाते. अशा काही वाईट रुढी समजात पसरल्या आहेत. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी गेल्या १९७६ मध्ये प्रचारक डीन आर. कॅम्बेल यांनी पहिल्यांदा LeftHandersday साजरा केला होता. तेव्हापासून दरवर्षी १३ ऑगस्टला डावखुऱ्या लोकांचे वेगळेपण दाखवून देण्यासाठी, त्यांची स्वतंत्र्य ओळख दाखवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास डावखुऱ्या व्यक्तीसाठी काही विशेष करून हा दिवस साजरा करू शकता. तसेच डाव्या हाताने काम करताना तुम्ही कुठल्या समस्यांना सामोरे जाता तसेच त्यामधून तुम्ही कसे यशाची शिखरे गाठले? याबाबतच्या पोस्ट #InternationalLeftHandersday या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करू शकता.

'हे' आहेत प्रसिद्ध डावखुरे व्यक्ती; 'या'ठिकाणी उभारले मेणाचे पुतळे -

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन, राष्ट्रपिता महात्मा गांधी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, शांततादूत मदर तेरेसा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, मीडिया प्रोप्रायटर ओपराह विनफ्रे, गायक मायकल जॅक्सन, आशा भोसले, उद्योगपती रतन टाटा, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत, महानायक अमिताभ बच्चन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वजण डावखुरे आहेत. याशिवाय अनेक महान व्यक्ती डावखुरे आहेत. यापैकी काही खास व्यक्तींचे गोव्यातील लोटली येथे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही डावखुरे असाल तर अजिबात न्युनगंड मानून घेऊ नका. कारण तुम्ही सुद्धा एक दिवस या सर्व यशस्वी व्यक्तींसारखे बनू शकता. कदाचित पुढील काळात तुमचे सुद्धा मेणाचे पुतळे या संग्रहालयात असतील. त्यामुळे #InternationalLeftHandersday अगदी उत्साहाने साजरा करा.

डावखुरे असण्याचे फायदे -

  • डावखुरे असण्याचा सर्वात मोठा लाभ खेळांमध्ये होतो. अनेक खेळाडूंना उजव्या खेळाडूंसोबत खेळण्याची सवय असते. त्यामुळे असे खेळाडू डावखुऱ्या खेळाडूसोबत खेळताना गोंधळतात. त्याचा फायदा डावखुऱ्या खेळाडूला होतो. त्यामुळे डावखुरे लोक अॅथलेटीक्समध्ये अधिक निपूण असतात. म्हणूनच की काय टेनिसपटू राफेल नदाल हा डावखुरा खेळाडू म्हणून टेनिसमध्ये आला. त्यावेळी त्याचे प्रशिक्षक टोनी नदाल यांनी त्याची ही विशेषतः ओळखली होती. त्याचा डावखुरेपणा त्याला टेनिस कोर्टमध्ये मोठी संधी देईल, असे ते म्हणाले होते.
  • जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के लोक डावखुरे आहेत. मात्र, सर्वाधिक 'आयक्यू' असणाऱ्या लोकांमध्ये डावखुऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अति उच्च आयक्यू असणाऱ्या मेन्सासारख्या महान व्यक्तीचा समावेश होतो.
  • एका अभ्यासानुसार, महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या तरुणांवर संशोधन करण्यात आले. त्यावेळी उजव्या लोकांपेक्षा डाव्या लोकांचे उत्पन्न १३ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले.
  • संशोधकांच्या म्हणण्यानुसार डावखुरे लोक नेहमीच प्रतिभावान आणि बुद्धीवंत असतात. १० डावखुऱ्या लोकांपैकी एक व्यक्ती गणितीय आकडेमोड अंत्यत तेजीने करीत असतो. तसेच त्याच्याकडे अलौकीक बुद्धीमत्ता असते.
  • हाताचा संबंध थेट मेंदूशी असतो. डावखुऱ्या लोकांचा मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यान्वित असतो. विशेष म्हणजे तर्क, तर्कशास्त्र आणि क्रिएटीव्हीटी यांसारखे कार्य उजवा मेंदू करीत असतो.
  • एका संशोधनानुसार, डावखुरे लोक दोन्ही मेंदूनी काम करीत असतात. त्यामुळे असे लोक माहितीवर अधिक वेगाने प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे त्यांना मास्टरमाईंड सुद्धा म्हटले जाते. यामध्ये अल्बर्ट आईनस्टाईनसारख्या शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
  • आयएफएल सायन्यसच्या अभ्यासानुसार, २ हजार ३०० विद्यार्थ्यांवर प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये काही उजवे आणि काही डावखुऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला. त्यांना अधिक कठीण गणिते देण्यात आली. त्यावेळी डावखुरे लोक अधिक वेगाने आणि अचून गणितीय आकडेमोड करीत असल्याचे आढळून आले.
  • डावखुरे लोक दोन्ही मेंदूचा त्याचबरोबर दोन्ही हातांचा वापर सहजतेने करू शकतात. मात्र, काही गोष्टी हाताळताना थोडा त्रास जात असतो. महत्वाचे म्हणजे मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यास मेंदूच्या कार्यप्रणालीत बिघाड होतो. अशावेळी उजव्या लोकांच्या तुलनेत डावे लोक लवकर बरे होत असतात.
  • अमेरिकेच्या आतापर्यंत झालेल्या ८ राष्ट्राध्यक्षांपैकी ५ राष्ट्राध्यक्ष डावखुरे होते. त्यामध्ये गेराल्ड फोर्ड, रोनाल्ड रेगन, जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा यांचा समावेश आहे.

डावखुऱ्या लोकांना येणाऱ्या समस्या -

  • डावखुऱ्या लोकांसाठी बाकाची योग्य रचना केलेली नसते. त्यामुळे त्यांना लिहितांना त्रास होतो.
  • उजव्या लोकांसाठी कात्री हाताळणे सोपे जाते. मात्र, डावखुऱ्या लोकांना कात्री हाताळताना त्रास जातो.
  • डावखुरा विद्यार्थी उजव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूला बसला असेल, तर नेहमी दोघांनाही त्रास होत असतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण होत असते.
  • वाद्य वाजवताना - डावखुऱ्या लोकांना सर्वसाधारण गिटार वाजवणे कठीण जात असते. त्यांच्यासाठी गिटाराच्या तारांची रचना डाव्या हातानुसार करावी लागते.
  • स्पायरल बाईंड केलेल्या वहिमध्ये लिहिताना डावखुऱ्या लोकांना अधिक त्रास होत असतो. काहीवेळा त्यांच्या हाताला दुखापत सुद्धा होत असते.
  • कम्प्युटरचा माऊस सर्वसाधारणपणे उजव्या हाताला ठेवलेला असतो. मात्र, डावखुऱ्या लोकांना त्या माऊसला डाव्या हातावर घेऊन हाताळावे लागते. मात्र, किबोर्डवरून हात काढून माऊस हाताळणे अनेकदा त्रासदायक ठरत असते.
  • काही वर्गखोल्यांमध्ये खुर्चीवरच लिहिण्यासाठी छोटीशी पाटी तयार केली जाते. मात्र, ती उजव्या बाजूला असते. अशावेळी लिहावे कसे? असा प्रश्न डावखुऱ्या लोकांसमोर निर्माण होतो.
  • तुम्ही लेफ्टी आहात का? दर १० मिनिटांनी तुम्हाला अशा कमेंट्स ऐकायला मिळत असतात. मात्र, त्या लोकांना माहिती नसते की त्यांच्या डावखुऱ्या सहकाऱ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसानिमित्त अशा कमेंट्स करणाऱ्या लोकांना डावखुऱ्या लोकांच्या समस्यांची जाणीव करून देणे हाच उद्देश असतो.

हात आणि मेंदूची रचना -

मेंदूची रचना फार गुंतागुंतीची आहे. मात्र, त्याला सविस्तरपणे समजून घेतल्यास डाव्या हाताने काम करण्याची सवय कशी लागते? ते लक्षात येते. आपला मेंदू आणि हाताची रचना क्रॉस वायरसारखी असते. त्यामुळे मेंदूचा डावा भाग उजव्या हातावर नियंत्रण ठेवत असतो, तर मेंदूचा उजवा भाग डाव्या हातावर नियंत्रण ठेवत असतो. त्यामुळे फक्त डावखुरे लोक उजव्या मेंदूचे असतात, असे म्हटले जाते.

Last Updated : Aug 13, 2019, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details