महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे राहतील बंद - इंडिया एअर बबल करार न्यूज

'ही बंदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे विशेष मंजूर झालेल्या विमान उड्डाणांवर लागू होणार नाही,' असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सध्या भारताने अनेक देशांशी 'एअर बबल' करार केले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांना कोणत्याही दिशेने प्रवास करण्यास अनुमती देण्यात येते.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे न्यूज
30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद राहतील

By

Published : Oct 28, 2020, 8:06 PM IST

नवी दिल्ली - भारतात येणारी आणि येथून इतर देशांमध्ये जाणारी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे केंद्राने बुधवारी सांगितले.

'ही बंदी आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाद्वारे विशेष मंजूर झालेल्या विमान उड्डाणांवर लागू होणार नाही,' असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा -अमेरिकेत एप्रिलमध्ये कोविड - 19 लस उपलब्ध होणार

'मात्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे केस-बाय-केस (केस-टू-केस) आधारावर निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते,' असे निवेदनात म्हटले आहे.

सध्या भारताने अनेक देशांशी 'एअर बबल' करार केले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांना कोणत्याही दिशेने प्रवास करण्यास अनुमती देण्यात येते.

कोविड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे 25 मार्चला सर्व प्रवासी हवाई सेवा बंद करण्यात आल्या. यानंतर 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

हेही वाचा -कोरोना : ब्राझीलमध्ये एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुप्पट

ABOUT THE AUTHOR

...view details