सोमवारी (14 जून) लडाखच्या पूर्वेला असलेल्या गलवान व्हॅली प्रांतात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले. यानंतर दोन्ही देशांमधील सीमावाद पुन्हा उफाळून आला. चिनी सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झाली. गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यांची झटापट झाली आणि यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आहे. चिनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच पार्श्वभूमीवर संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. सीमेवर करण्यात आलेली घुसखोरी चीनने जाणूनबुजून केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्यासाठी ही चीनची रणनीती असल्याचे त्यांनी म्हटले.
विशेष मुलाखत : 'चीनची पावलं जाणीवपूर्वक, भारताच्या वाढत्या महत्त्वाला शह देण्याची रणनीती' - नितीन गोखले
सोमवारी (14 जून) लडाखच्या पूर्वेला असलेल्या गलवान व्हॅली प्रांतात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले. यानंतर दोन्ही देशांमधील सीमावाद पुन्हा उफाळून आला. चिनी सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू झाली. यादरम्यान, गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही सैन्यांची झटापट झाली; आणि यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आले. चिनी सैन्याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. याच पार्श्वभूमीवर संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.
चीनला भारतासोबत असणारा सीमावाद कायम ठेवायचा असून त्याचा वापर आंतरराष्ट्रीय रणनीतीसाठी करायचा आहे. १९५०पासून चीनचे १४ देशांसोबत विविध ठिकाणी सीमावाद होते. त्यातील त्यांनी १२ सोडवले आहेत. मात्र भारत आणि भूतानसोबत असणारा सीमावाद त्यांनी सोडवला नाही. चीनचे राज्यकर्ते भारताला दीर्घकालीन स्पर्धक मानतात. हे वाद सुटल्यास भारत प्रगतीपथावर लवकर येईल, आणि चीनला याचीच भीती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील चीन भारतासोबत सीमावाद सोडवणार नाही, असे संरक्षण अभ्यासक नितीन गोखले यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात चीनसोबत संबंध सुधारायचे असल्यास द्विपक्षीय चर्चा आणि डिप्लोमसीच्या साहाय्यानेच पुढे जावे लागेल. पाकिस्तानपेक्षा चीनवर लक्ष केंद्रित केल्यास येणाऱ्या काळात पाकिस्तान आपोआप बाजूला पडेल. त्यासाठी आर्थिक, संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या स्तरांवर आपण बदल करणे आवश्यक आहे. डोकलाममध्ये झालेल्या अपमानाचा आत्ता बदला घेण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचे त्यांनी सांगितले.