पणजी (गोवा)- शुक्रवारी दुपारपर्यंत पडणाऱ्या जोरदार पावसाने रात्रीपासून उसंत घेतली. त्यामुळे नागरिकांना शनिवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे. मागील चोवीस तासात राज्यातील पेडणे येथे सर्वाधिक ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून म्हापसा, फोंडा येथे पावसाने दडी मारली आहे.
मागील आडवड्यात आलेल्या पावसामुळे पणजी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर टीकाही झाली होती. गोव्याच्या अनेक भागात पडझड आणि काही ठिकाणी पुराच्या घटना घडल्या होत्या. मात्र, काल पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र ऊन दिसत होते.
हवामानाची माहिती देताना गोवा वेधशाळेचे अधिकारी, डॉ, सानप एका बाजूला मुंबईच्या उपनगरात पूरस्थिती असताना पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या गोव्यात सकाळपासून पावसाचा टीपुसही दिसला नाही. याबद्दल गोवा वेधशाळेचे पुर्वानुमान अधिकारी, डॉ.एस.डी. सानप यांना विचारले असता ते म्हणाले होते की, कालपर्यंत कोकण आणि गोवा भागात चांगला पाऊस झाला. राज्यातील १३ पैकी ४ ठिकाणी अतिवृष्टी नोंदवली गेली. काल (शनिवारी) दुपारी किवा रात्री पावसाचे परत आगमन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर मान्सूनचे ढग उत्तरेकडे वेगाने सरकत आहेत. अशावेळी मुंबई परिसरात ढगांची घनता वाढल्याने तेथे अधिक पाऊस होत आहे. शनिवारी गोव्यातही चांगला पाऊस पडेल. त्याचबरोबर काल (शनिवारी) दिवसभर पणजी शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता, डॉ. सानप यांनी वर्तविली होती.