बिरूत (लेबनॉन)- बिरूत येथे एका भीषण स्फोटात 70 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. शहरातील एका बंदरातील गोदामामध्ये ठेवून असलेल्या ज्वलनशील पदार्थाला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे संपूर्ण परिसर हादरले. आसपासच्या इमारती देखील या स्फोटाच्या कवेत आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लेबनॉन: बिरूत येथे भीषण स्फोट, 70 जणांचा मृत्यू तर 2 हजारांवर नागरिक जखमी
अचानक घडलेल्या हा स्फोट अनेक लोकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. स्फोट होताच हवेत एक मशरूम सदृश्य आकाराचा धूर निघाला व त्याने आसपासच्या सर्व इमारतींना आपल्या कवेत घेतले. स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली असून मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अचानक घडलेला हा स्फोट अनेक लोकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. स्फोट होताच हवेत एक मशरूम सदृश्य आकाराचा धूर निघाला व त्याने आसपासच्या सर्व इमारतींना आपल्या कवेत घेतले. स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली असून मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेनंतर जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या थरारक घटनेनंतर इतर देशातील राजकारण्यांनी मृतक आणि जखमींप्रती संवेंदना व्यक्त केल्या आहेत. यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पूतीन, इराणचे विदेश मंत्री जवद झारिफ यांचा समावेश आहे.