नवी दिल्ली -राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टला प्रस्तावित आहे. अयोध्येत या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जैश- ए- मोहम्मद आणि लष्कर- ए-तोयबा या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंंत्रणांनी दिली आहे.
राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; पाकिस्ताननं आखला कट... - रामजन्मभूमी दहशतवादी हल्ला बातमी
भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनास उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळी अनेक इतर नेतेही आणि व्हिआयपी उपस्थित असतील. या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा रॉने दिला आहे.
भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनास उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळी अनेक नेते आणि व्हिआयपी उपस्थित असतील. त्यांना लक्ष्य कऱण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमावर हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी असल्याचा इशारा रॉ ने दिला आहे. राम मंदिर भूमी आणि परिसरात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांच्या मदतीने मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे रॉ ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी आयएसआयने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर पाकिस्तानी आय़एसआयने अयोध्या आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी भारतात हल्ले करण्यासाठी तीन ते चार दहशतवादी पाठविल्याचे रॉ च्या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली, अयोध्या आणि काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.