मालदीव(माली) - कोरोना लॉकडाऊनमुळे परदेशात अ़़डकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय नौदल 'समुद्र सेतू' नावाची मोहीम राबवली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस जलाश्व या जहाजाने मालदिवच्या माली बंदरात प्रवेश केला आहे.
लॉकडाऊनमुळे मालदीवमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी पोहचले आयएनएस जलाश्व - आयएनएस जलाश्व
भारतीय नौदलाने दोन दिवसांपूर्वी परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 'समुद्र सेतू' नावाच्या मोहीमेची घोषणा केली. याच मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आयएनएस जलाश्व मालदिवला पोहचले आहे. आयएनएस जलाश्वसोबतच 'आयएनएस मगर'हे जहाजही या मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. 'आयएनएस मगर'हे ८ मे ला मालदीवला पोहचणार आहे.

पहिल्या टप्प्यात एक हजार भारतीय नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर काळजी घेण्यात येणार आहे. मालदिववरून आणलेल्या नागरिकांना केरळमधील कोची बंदरात उतरवण्यात येणार आहे.