मलप्पुरम (केरळ) -हत्तिणीला अननसामधून स्फोटके खायला दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संपूर्ण देशभर याबद्दल प्रतिक्रीया उमटल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी (8 जून) एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. केरळच्या मलप्पुरमध्ये दोन हत्तीच्या लढाईमध्ये एक हत्ती गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच वेळी त्याचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू - elephant died
हत्तिणीला अननसामधून स्फोटके खायला दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण देशभर याबद्दल प्रतिक्रीया उमटल्या. पुन्हा सोमवारी (8 जून) एका हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू!
गेल्या आठवड्यामध्ये वन रक्षकांना जंगलामध्ये एक जखमी हत्ती आढळून आला. त्यांनी त्या हत्तीला प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यावर उपचार सुरू केले. हत्तीच्या प्रकृतीमध्ये थोडासा फरकही पडला. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले असल्याची माहिती वन अधिकारी सज्जिकुमार यांनी दिली. तसेच ते म्हणाले त्या हत्तीला झालेली जखम ही कुठल्या व्यक्तीने केलेली नसून, दोन हत्तीच्या लढाईमध्ये झाली होती.