नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या लोकसभेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती आणि बजेटशी संबंधित आर्थिक वित्त समजून घेण्यासाठी मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची ईटीव्ही भारताने खास मुलाखत घेतली.
मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची खास मुलाखत संरचनेच्या विकासावर केलेल्या गुंतवणूकीमुळे आर्थिक पुनरुज्जीवन होईल. यामुळे रोजगार निर्मितीही होईल, असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर खर्च केल्याने अर्थव्यवस्था रुळावर येईल. आर्थिक वर्ष 2023 पर्यंत कोरोना साथीच्या आधीची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
कामगार कायद्यांच्या सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करणे सोपे होईल, असे कृष्णमूर्ती म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंजूर केलेल्या नवीन शेतकरी कायद्यांचेही त्यांनी समर्थन केले. अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे कायदे फायदेशीर ठरतील, असे ते म्हणाले.
दोन टप्प्यात होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन -
पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 8 मार्च ते 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत लोकसभेचे कामकाज चालणार आहे. तर सायंकाळी 4 ते 9 दरम्यान शून्य प्रहर आणि प्रश्न विचारण्याचा तास असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, असेही बिर्ला यांनी आवाहन केले.