चंदीगड -कोरोनाबाबत सोशल मीडियावर विविध अफवा परविण्यात येत आहे. काळजी घेण्यासाठीही विविध पद्धती सांगितल्या जात आहेत. भाजीपाल्याला साबण-पाण्याने धुवा मगच त्याचे सेवन करा, अशाही पोस्ट व्हायरल होत आहेत. पण, हे आपल्या आरोग्यास ठिक आहे का.? याबाबत पंचकूला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जसजीत कौर यांच्याशी बातचीत केली.
डॉक्टर्सचा सल्ला
डॉ. जसजीत कौर म्हणाल्या, साबण जर आपल्या शरिरात गेला त्याचे मोठे नुकसान आहे. भाजीपाला पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच जे काही वस्तू बाहेरून आणतो ते सर्व स्वच्छ धुणे गरजेचे आहे.