महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा उघड.. पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याचे मिळाले ताजे पुरावे

ही कारवाई दहशतवाद्यांची किंवा पाकिस्तानच्या सीमा कारवाई दलाकडूनही (BAT - Border Action Team) जाणीवपूर्वक केलेली असू शकते, असा अंदाज भारतीय लष्कराने वर्तवला आहे.

पाकव्याप्त काश्मीर

By

Published : Sep 18, 2019, 12:26 PM IST

काश्मीर - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी वारंवार कुरापती काढण्यात येत आहेत. नुकतेच भारतीय लष्कराला पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात येत असल्याचे ताजे पुरावे मिळाले आहेत. भारतीय लष्कराकडून 12-13 सप्टेंबर 2019 चे फुटेज मिळाले आहे. यामध्ये जमिनीवरून आडमार्गाने भारताच्या सीमेवर घुसखोरी केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ही कारवाई दहशतवाद्यांची किंवा पाकिस्तानच्या सीमा कारवाई दलाकडूनही (BAT - Border Action Team) जाणीवपूर्वक केलेली असू शकते, असा अंदाज भारतीय लष्कराने वर्तवला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्यदल पाकिस्तानच्या विशेष सेवा दलाच्या कमांडोज किंवा दहशतवाद्यांवर ग्रेनेड तोफा (Under Barrel Grenade Launchers) रोखून असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - फारूक अब्दुल्लांच्या नजरकैदेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले...

ही घुसखोरी किंवा सीमा कारवाई दलाच्या हालचाली पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर येथे आढळून आल्या आहेत. घुसखोरीचा प्रयत्न वारंवार हाणून पाडल्यानंतरही पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय लष्कराने पाककडून नियंत्रण रेषेवर होणाऱ्या घुसखोरीचे १५ हून अधिक प्रयत्न उधळून लावले होते.

हेही वाचा - पाकिस्तानात हिंदू मुलीची हत्या, धर्मांतरण करण्यास राजी न झाल्याने कृत्य?

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details