श्रीनगर - चीन-भारतादरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनपाठोपाठ पाकिस्तानी सैन्यांच्याही सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. मात्र, भारतीय जवानही सतर्क असून कोणत्याही कारवाईला ते चोख प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या वर्षींपेक्षा जास्त घुसखोरीच्या घटना यंदा रोखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानातून घुसखोरीचा आकडा 130 च्या जवळपास होता. मात्र, यावर्षी ही आकडेवारी 30 ने कमी झाली आहे, अशी माहिती लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली.
भारतीय गुप्त संघटनांच्या माहितीनुसार पाकिस्तानी सीमेवर जवळपास 250 ते 300 दहशतवादी आहेत. आम्ही त्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना असफल केले आहे. घुसखोरीचा आकडा कमी झाल्याने अंतर्गत परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होते. आज पपाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारे तस्करीचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानची वृत्ती बदलेली नाही, असे ते म्हणाले.