इंदुर - मध्य प्रदेशातील बेटमा येथे गावकऱ्यांनी हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सनाच्या दिवशी नवीन घर भेट म्हणून दिले आहे. यावेळी वीरपत्नीसाठी तिच्या भावडांनी चक्क तळहाताच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यांच्या तळ हातावर पाय ठेवतच तिने घरात प्रवेश केला.
कौतुकास्पद! स्वातंत्र्यदिनी हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी दिली 'ही' अनोखी भेट
मध्य प्रदेशातील बेटमा येथे गावकऱ्यांनी हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सनाच्या दिवशी नवीन घर भेट म्हणून दिले आहे.
हुतात्मा मोहन सिंह सुनेर यांना त्रिपूरा येथे आंतकवाद्याशी लढताना वीरमरण आले होते. गेल्या 27 वर्षापासून त्यांचे कुटुंब तोडक्या मोडक्या घरात राहत होते. याचबरोबर उदरनिर्वाहासाठी पेन्शनची रक्कम पुरत नसल्यामुळे मोहन सिंह यांच्या पत्नी मजुरी करून आपले पोट भरत होत्या.
या कुटुंबाची बिकट परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी 'एक चेक एक सही' ही मोहीम राबवत तब्बल 11 लाख रुपये जमा केले. त्या जमलेल्या पैशांमधून नवीन घर बांधले. गावकऱ्यांनी शहिदाच्या कुटुंबासाठी जे केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.