इंदोर- अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर मंदिर निर्मितीच्या कामास वेग आला आहे. याचा उत्साह भाविकांमध्येही दिसून येत आहे. मंदिर निर्मितीच्या कामासाठी राम भक्तांकडून स्वयंस्फुर्तीने हातभार लावला जात आहे, अशाच प्रकारे मध्यप्रदेशातील देवरुडीया येथील एका राम भक्ताने राम मंदिर निर्मितीसाठी चक्क पोकलेन मशीन पाठवून दिल्याची माहिती समोर आली आहे.
इंदोरच्या भाविकाने राम मंदिर निर्मितीसाठी पाठवले पोकलेन मशीन - Kailash Vijayvargiya
दिनेश बेनिवाल असे त्या रामभक्ताचे नाव आहे. त्यांनी हे पोकलेन मशीन राम मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होईपर्यंत तेथेच वापरले जाणार असल्याचे सांगितले. भाजप जनरल सेक्रेटरी कैलास विजयवर्गीय यांनी या पोकलेन मशीनची पूजा केली.
इंदोरच्या भक्ताने राम मंदिर निर्मितीसाठी पाठवले पोकलेन मशीन
दिनेश बेनिवाल असे त्या रामभक्ताचे नाव आहे. त्यांनी हे पोकलेन मशीन राम मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होईपर्यंत तेथेच वापरले जाणार असल्याचे सांगितले. भाजप जनरल सेक्रेटरी कैलास विजयवर्गीय यांनी या पोकलेन मशीनची पूजा केली.
या मशीन सोबत ब्रेकर ही पाठवण्यात आला आहे, याच मशीनच्या साहाय्याने मंदिराचा पाया खोदला जाणार असल्याचे विजयवर्गीय म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्टला मंदिरच्या निर्मितीसाठी भूमिपूजन केले होते.