नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठा आहे. यातच मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका खासगी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चुकीच्या कुटुंबाला सोपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक! चुकीच्या कुटुंबाला सोपवला कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह - इंदूर कोरोना अपडेट
मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये एका खासगी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चुकीच्या कुटुंबाला सोपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या गेंदालाल राठोड यांच्यावर इंदौरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचामृत्यू झाला. त्यावेळी गेंदालाल यांच्या मृतदेहाऐवजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह संबधित कुटुंबाला सोपवला. काही वेळानंतर हा घोळ कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. मात्र, तोपर्यंत गेंदालाल यांचे कुटुंब तो मृतदेह घेऊन 80 किलोमीटर दूर गेले होते. तथापि, रुग्णालय प्रशासनाकडून चूक सुधारण्यात आली असून प्रशासनाकडून खेद व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 88 हजार 600 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 59 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. काल दिवसभरात 9 लाख 87 हजार 861 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 7 कोटी, 12 लाख, 57 हजार 836 एवढी झाली आहे.