महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारत-पाकिस्तानने चर्चा करून सीमेवरील रक्तपात थांबवावा'

भारत पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेचे आयोजन करावे. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढून सीमेवरील रक्तपात कायमचा थांबवावा, अशी मागणी हुर्रीयत कॉन्फरन्स मवाळ पक्षाने केली आहे.

मिर्झवा उमर फारुख
मिर्झवा उमर फारुख

By

Published : Nov 14, 2020, 9:04 PM IST

श्रीनगर - भारत-पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेचे आयोजन करावे. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढून सीमेवरील रक्तपात कायमचा थांबवावा, अशी मागणी हुर्रीयत कॉन्फरन्स मवाळ पक्षाने केली आहे. तसेच हुर्रीयतने सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध केला.

सीमेवरील रक्तपात कायमचा थांबवावा

पक्षाचे नेते मिर्झवा उमर फारुख यांनी सीमेवरील रक्तपातानंतर दु:ख व्यक्त केले. पाकिस्तानने काल शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात चार भारतीय जवान शहीद झाले, तर स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानचही सुमारे दहा ते १२ जवान आणि नागरिक भारताच्या गोळीबार ठार झाले.

पाकिस्तानकडून शस्त्रंसधीचे उल्लंघन

काल काश्मीरातील उरी, गुरेज सेक्टरबरोबरच पाकिस्तानी लष्कराने केरेन सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यास भारतीय लष्कराने जोरदार गोळीबाराने उत्तर दिले. उखळी तोफा, मशीन गनद्वारे पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा कट पाकिस्तानी लष्कराने आखला होता. मात्र, गोळीबार करत भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा डाव उथळून लावला.

पाकिस्तानी लष्कराने काल (शुक्रवार) जम्मू काश्मीरमधील उरी आणि गुरेज सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील दोन आणि आसाम, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details