नवी दिल्ली - ईझीमाय ट्रीप डॉट कॉम (EaseMyTrip.com) या ट्रॅव्हल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंडिगो आणि एअर एशिया या कंपन्यांनी आता देशांतर्गत विमानसेवेसोबतच ग्राहकांना रद्द झालेल्या फ्लाइट्सच्या तिकिटांचे रिफंड देण्यासही सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रॅव्हल एजंट्च्या खात्यामध्ये विमानाच्या तिकिटांचे रिफंड जमा करणे सुरू केले आहे. ही ट्रॅव्हल एजंट्सच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असून आता ग्राहकांना रिफंड करताना सुविधा होणार आहे.
ईझीमाय ट्रीप डॉट कॉमचे (EaseMyTrip.com.) सीईओ निशांत पिट्टो याबाबात माहिती देताना म्हणाले, आता ज्या प्रवाशांना स्थगित झालेल्या विमानयात्रेच्या तिकिटाचे क्रेडिट शेलच्या जागी सरळ रिफंड हवे असेल ते त्यानुसार त्या प्रवाशांना देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत एअर एशियाने ईझीमाय ट्रीप डॉट कॉमला ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आम्हाला हे पैसे एअर एशियाच्या तिकिटांच्या वॉलेट प्रणालीतून प्राप्त झाले. त्यानंतर आम्ही संबधित ग्राहकांना त्यांच्या खात्यात तिकिटांचा परतावा दिला, असे ते म्हणाले.