नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीनदरम्यान तणाव असून दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताने आपली लष्कर क्षमता वाढवण्यावर जोर दिला आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी आज विशाखापट्टणममध्ये 'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौकेला भारतीय नौदलात सामील केले. या युद्धनौकेमुळे नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ झाली आहे.
'आयएनएस कवरत्ती' ही युद्धनौका प्रकल्प 28 अंतर्गत तयार करण्यात आली आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्र प्रणालीयुक्त असून दूरवरील लक्ष्य साधू शकते. तसेच युद्धनौकेत सेल्फ डिफेन्स कार्यप्रणाली आहे. यात वापरण्यात आलेली यंत्रणा 90 टक्के पूर्णपणे भारतीय आहे. संपूर्ण परीक्षण आणि चाचण्या करण्यात आल्यानंतर आज ही युद्धनौक नौदलाला सुपूर्द करण्यात आली. पाणबुडीच्या ठिकाणाचा ठाव घेण्यासाठी युद्धनौकेत सेंसर आहेत. तसेच ही रडारवरही दिसत नाही.