नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'आत्मनिर्भर भारत डिफेन्स इंडस्ट्री आऊटरीच वेबिनार'ला संबोधीत केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतवर जोर दिला. आपला उद्देश भारतीय संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढवणे आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारताकडे संरक्षण उत्पादन करण्याची क्षमता होती. मात्र, दुर्देवाने त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबिनारला संबोधित करताना म्हणाले.
'संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारताची जागतिक स्तरावर मान उंचावेल' - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'आत्मनिर्भर भारत डिफेन्स इंडस्ट्री आऊटरीच वेबिनार'ला संबोधीत केले. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारतावर जोर दिला.
देशात नवे तंत्रज्ञान तयार व्हावीत आणि त्याचा विकासही भारतातच व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत. आत्मनिर्भरतेचा संकल्प फक्त कागदावरचा नसून त्यासाठी एकानंतर एक असे योग्य आणि ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत. आपल्या पुढेच जायचे, विश्व शांतीसाठी एक सक्षम भारताची निर्मिती करण्याचे लक्ष्य असल्याचे मोदी म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यात आपले योगदान देण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे, असेही मोदी म्हणाले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात एफडीआय मर्यादा 74 टक्के करण्यात आली आहे. तसेच तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन डिफेन्स कॉरिडॉर सुरु करण्यात येणार आहेत. . यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये २० हजार कोटींच्या गुंतवणुकीचं ध्येय आहे. सर्व सहकारी मिळून आपल्या प्रयत्नांनी 'मेक इन इंडिया' आणि 'मेक फॉर वर्ल्ड' चे लक्ष्य प्राप्त करतील, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.